राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना घोडेगाव पेठ गणातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल .


घोडेगाव : वार्ताहर
        आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आय, व मित्र पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना घोडेगाव पेठ गणातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल .असा विश्वास घोडेगाव गावच्या सरपंच क्रांतीताई गाढवे यांनी व्यक्त केला .
            घोडेगाव येथिल आठवडे बाजारात मतदारांशी घोडेगाव राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला .घोडेगाव व परिसरात आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे मतदारांना सांगण्यात आली. यावेळी ज्योती घोडेकर, रत्नाताई गाडे, माधवी कर्पे, रुपाली झोडगे, आश्विनी मंडलिक, मयुरी शिंगाडे,वर्षा काळे, शोभाताई सुर्यवंशी, रोहीणी बकरे, अर्चना घोडेकर, सुवर्णा भास्कर, सायली घोडेकर, अक्षदा आर्वीकर, सुवर्णा काळे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .
            घोडेगाव परिसरात दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. नुकतीच लोकसभा निवडणूक झाली . त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार डॉ .अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाले होते .आता विधानसभा निवडणूकीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील उभे आहेत . घोडेगाव परिसरात झालेल्या विकास कामांच्या जोरावर वळसे पाटील यांना सर्वाधिक मतदान होईल . वळसे पाटील यांना मिळणाऱ्या मताधिक्यात घोडेगाव शहर व परिसराचा मोठा वाटा राहणार आहे . असाही विश्वास सरपंच क्रांतीताई घोडेकर यांनी व्यक्त केला .
          या महिला पदाधिकाऱ्यांनी घोडेगावच्या बाजारात विक्रेते,ग्राहक यांच्याशी संवाद साधला .
         फोटो -:घोडेगाव येथिल आठवडे बाजारात विक्रेते ,ग्राहकांशी, संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी .( समाप्त ) ..

टिप्पण्या