मंचर परिसरात पोलिसांनी केले संचलन.

                                  
दि.१३/१०/२०१९
मंचर (प्रतिनिधी)ः आंबेगाव तालुक्यात विधानसभेची निवडणुक शांततेत पार पाडावी.म्हणुन मंचर पोलिस ठाण्याच्या वतीने मंचरसह इतर गावात पोलिस संचलन रविवार दि.१३ रोजी करण्यात आले.५० रायफलधारी कंमांडो आणि मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस सहभागी झाले होते.अशी माहीती मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.
सोमवार दि.२१ रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांच्यात लढत होत आहे.मतदान शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावे.यासाठी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्या उपस्थितीत मंचर,अवसरी खुर्द,अवसरी बुद्रुक,निरगुडसर,पारगांव गावातुन पोलिस संचलन करण्यात आले.यावेळी पोलिस उपनिरिक्षक अर्जुनराव qशदे,गुप्तचर विभागाचे विनोद गायकवाड यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि ५० रायफलधारी कमांडो संचलनामध्ये सहभागी झाले होते.
छायाचित्र मजकुर-मंचर बसस्थानक येथे मंचर पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस संचलन करण्यात आले
------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना घोडेगाव पेठ गणातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल .

आंबेगाव विधानसभा मतदार संघात झालेले आतापर्यंतचे मतदान