आंबेगाव विधानसभा मतदार संघात झालेले आतापर्यंतचे मतदान
मंचर ता 21अंबेगाव विधन सभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजता 20.9 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी(आय एएस ) व निवडणूक निर्णय अधिकारी रमा जोशी यांनी दिली.
सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदान केंद्राच्या बाहेर काही ठिकाणीपोलीस व सीएसआयपी जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकारी यांची सतत फिरती सुरू आहे. पोलिसांचे पथकही या भागात लक्ष ठेवून आहे. मतदानाची टक्केवारी वाढू लागलेली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा