अवसरी बुद्रुक परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ.


                                                                                             दि.१३/१०/२०१९
मंचर (प्रतिनिधी)ः अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव येथील qहगेवस्ती येथील चार बंद घरांचे कुलुप तोडुन कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकुण २० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी रविवार दि.१३ रोजी पहाटे  चोरुन नेला.तसेच शरद मार्तंड चवरे यांच्या बंद घरातील   कांदे आणि लसुण चोरुन नेल्याने ग्रामस्थांनी चोरट्याविषयी आश्चर्य व्यक्त केले आहे.
qहगेवस्ती येथील  चवरे मळ्यातील आशा सुरेश चवरे यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन कपाटातील रोख रक्कम १० हजार रुपये,साड्या,चांदीची जोडवी,सोन्याची चमकी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली.त्यांच्या शेजारी राहत असलेल्या शरद मार्तंड चवरे यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन ७ किलो कांदे आणि १ किलो लसुण चोरट्यांनी लंपास केला.त्यानंतर चोरटे काळआंबा वस्तीतील निवृत्ती नामदेव हिंगे यांच्या घरातील बंद घराचे कुलुप तोडुन साड्या चोरुन नेल्या.लक्ष्मण भगवंत qहगे यांच्याही बंद घराचे कुलुप तोडुन घरातील कपड्यांच्या बॅगा शेतात नेल्या.बॅगेतील साड्या आणि लोखंडी कपाटातील किरकोळ सामान चोरुन नेले.कल्याणराव qहगे पाटील,सागर qशदे पाटील यांनी चोरी झाल्याची माहीती मंचर पोलिस ठाण्याला कळविली. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक अर्जुन qशदे,पोलिस कर्मचारी राजेंद्र हिले,वाय.पी.रोडे,चंद्रशेखर डुंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली.आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील गावागावात भंगार गोळा करणारे,साड्या विकणारे,भांडी विकणारे अनेक जण वाड्या वस्त्यांवर फिरत आहेत.त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने हे व्रिकेते रात्रीच्या वेळी चोरी करत असावेत.असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.आठ दिवसापुर्वी अवसरी खुर्द गावात पाच ठिकाणी चोरट्यांनी किराणा दुकान आणि मंदिराचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला होता.तो सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेèयात कैद होवुनही अद्यापपर्यंत पोलिसांना चोरटे पकडण्यात यश न आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
छायाचित्र मजकुर-अवसरी बुद्रुक-qहगेवस्ती चवरेमळ्यातील आशा सुरेश चवरे यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले.
------------------------------------------------

टिप्पण्या